गौरव मोरेचं ‘कांद्यापोह्यां’वरचं कमाल ! गौरवचं तेजश्री प्रधानला प्रपोज……

गौरव मोरेचं ‘कांद्यापोह्यां’वरचं कमाल ! गौरवचं तेजश्री प्रधानला प्रपोज......

गौरव मोरेचं ‘कांद्यापोह्यां’वरचं कमाल! तेजश्री प्रधानला स्थळ चालून आलं; पुढे काय झालं, वाचा…

मराठी मनोरंजन विश्वात सध्या एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे थेट तेजश्री प्रधानला लग्नाची मागणी घालायला पोहोचला! आणि हे दृश्य पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेना.

पण थांबा… ही खरी गोष्ट नाही, तर येणाऱ्या मालिकेचा भन्नाट प्रोमो आहे.

झी मराठीवरील तेजश्री आणि सुबोध भावेची नवी मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘हॅशटॅग तदैव मंगलम’ नंतर पुन्हा एकदा ही सुपरहिट जोडी एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे.

यात तेजश्री ‘स्वानंदी’ तर सुबोध ‘समर’च्या भूमिकेत दिसणार आहे.

कथेत स्वानंदीचं लग्न काही केल्या ठरत नाही. आणि अशातच एक ‘तडाखेबाज’ स्थळ चालून येतं – ते म्हणजे गौरव मोरे!

व्हिडिओमध्ये गौरवचा ‘कांद्यापोह्यांचा इंटरव्ह्यू’ भन्नाट आहे.

गौरव विचारतो, “तुमचं नाव?”

तेजश्री म्हणते, “स्वानंदी.”

पुढे प्रश्न, “तुम्ही काय करता?”

स्वानंदी अभिमानाने सांगते, “मी एन्व्हायर्मेंटल सायन्समध्ये पीएचडी केली आहे आणि टुरिस्ट कंपनीत जॉब करते.”

हे ऐकल्यावर गौरवचा चेहरा बघण्यासारखा! त्याला वाटतं—“म्हणजे तुमची बारावी झाली नाहीये…” आणि स्वानंदी अवाक्!

यानंतर स्वानंदी त्याच्या शिक्षणाबद्दल विचारते, तर गौरव पटकन विषय बदलून म्हणतो—

“तुमचं घर मस्त आहे, सोफा पण भारीय!”

हा प्रोमो पाहून नेटिझन्स अक्षरशः खदखदून हसत आहेत. मालिकेच्या धमाल आणि भावनिक ट्विस्टची झलक या एका व्हिडिओतच मिळतेय.

Read also :https://ajinkyabharat.com/maji-upasashrapati-jagdeep-dhankhad-nazarkadeet/