गोरक्षण आणि स्वच्छता अभियानात दाखवला सक्रिय सहभाग

४०० के.व्ही. उपविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोरक्षण सेवा व स्वच्छता कार्यक्रम यशस्वी केला

अकोट – मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त (१७ सप्टेंबर २०२५) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर २०२५) या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या “सेवा पंधरवाडा” उपक्रमांतर्गत ४०० के.व्ही. वाहिनी दुरुस्ती व देखभाल उपविभाग, अकोटच्या अधिकारी, कर्मचारी आणि विद्युत सहाय्यकांनी अकोट गोरक्षण सेवा समिती, दर्यापूर रोड येथे गोसेवा आणि स्वच्छता कार्यक्रम राबविला. या उपक्रमात सर्व गाईंना चारा-पाणी देण्यात आले, गोठ्याची स्वच्छता करण्यात आली आणि गोरक्षणाबाबत माहिती दिली गेली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव काकड, प्रमोद बोचे, अमोल मानकर, अनुसया नागोरे, विद्या मेश्राम, निकेश माहुलकर, रामदास खारोडे, राजपाल जावरकर, वैभव कोगदे, मो. देशमुख, प्रतीक अढाऊ, नरेंद्र गावंडे आणि विजय पात्रीकर यांनी सहभाग घेतला. अकोट गोरक्षण सेवा समितीचे व्यवस्थापक मनिष इटणारे आणि सचिव डॉ. सुधीर मुळे यांनी गोरक्षण व संगोपनाबाबत माहिती दिली व पारेषण कंपनीचे आभार व्यक्त केले.

read also:https://ajinkyabharat.com/donald-trumpcha-shocking-decision/