जाणून घ्या फिनटेक अ‍ॅप्सचे फायदे आणि तोटे!

बँका आणि NBFC व्यतिरिक्त कर्ज कुठून घेता येईल?

आपत्कालीन परिस्थितीत कर्जाची गरज भासल्यास फिनटेक अ‍ॅप्स बनू शकतात पर्याय! जाणून घ्या कर्ज मिळवण्याची प्रक्रिया, फायदे, मर्यादा आणि जोखीम.आयुष्यात कधीही कोणालाही पैशाची गरज भासू शकते. अशा वेळी आपत्कालीन निधी नसेल, तर कर्ज घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. बहुतेक लोक पर्सनल कर्जासाठी बँका किंवा NBFC कडे धाव घेतात, मात्र आता या दोन्हीशिवायही एक पर्याय उपलब्ध आहे — तो म्हणजे फिनटेक अ‍ॅप्स. फिनटेक म्हणजे Financial Technology — म्हणजेच तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक सेवा. हे अ‍ॅप्स ऑनलाइन बँकिंग सुविधा, गुंतवणूक सेवा आणि पर्सनल लोनही देतात.
या अ‍ॅप्समधून लहान रकमेचं कर्ज — साधारणतः ₹25,000 ते ₹50,000 — सहज मिळू शकतं.

प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि वेगवान ,कमी कागदपत्रं, त्वरित कर्ज मंजुरी आणि रक्कम खात्यात जमा, व्याजदर जास्त असण्याची शक्यता, कर्ज मर्यादित रकमेचं (मोठ्या कर्जासाठी बँकच योग्य), काही अ‍ॅप्सकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते. जर तुम्हाला तात्काळ पैशांची गरज असेल, आणि बँकेकडून कर्ज घेण्यासाठी वेळ नसेल, तर फिनटेक अ‍ॅप हा उत्तम पर्याय आहे. पण जर वेळ आणि चांगला क्रेडिट स्कोअर असेल, तर बँकेकडून कर्ज घेणं अधिक सुरक्षित आणि किफायतशीर ठरेल. फिनटेक अ‍ॅप्समुळे तात्काळ कर्ज मिळणं सोपं झालं आहे, पण निर्णय घेण्यापूर्वी व्याजदर, अटी आणि शुल्क काळजीपूर्वक तपासा. आपत्कालीन गरजेत जलद मदत – फिनटेक अ‍ॅप्स तुमच्या सेवेत!”

read also:https://ajinkyabharat.com/gaan-gatana-emotion-vahayacha-bhaijaan/