रिसोड: गणपती मंडळाजवळ सुरू असलेल्या साऊंड सिस्टमच्या आवाजावरून झालेल्या भयंकर हल्ल्याने रिसोड तालुक्यातील धोडप खुर्द गावात संताप निर्माण केला आहे. 4 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास, सात जणांनी जातिवाचक शिवीगाळ करून, काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत अभिजीत देबाजी यांचे डोके फोडून जखमी झाले, तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिली गेली.
घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, धोडप खुर्द गावात गणपती मंडळाजवळ वाजत असलेल्या साऊंड सिस्टमच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत होता. यावरून अभिजीत साहेबराव डुकरे आणि अभिजीत देबाजी यांनी आवाज कमी करण्यासाठी पुढे गेले. परंतु यावेळी अंकलेश पाटील, आशिष खोडके, प्रवीण उगले, दत्ता खोडके, दिगंबर उगले, विश्वंभर खोडके आणि गणेश उगले यांनी जातिवाचक शिवीगाळ करत त्यांना जमिनीवर पाडले व काठी-लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
पोलिस कारवाई
रिसोड पोलिसांनी सातही आरोपींविरोधात कलम 118(1), 115(2), 189(2), 191(2), 191(3), 190 बि एन एस, तसेच जुने कलम 324, 323, 143, 147, 148, 149 भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण केला असून, गणपतीच्या साऊंडवरून झालेल्या या हिंसक व जातिवाचक हल्ल्याची पोलिस तपास अजून सुरू आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/new-holy-holy-natyavar-deadly-halla/