वरुणराजाच्या सरींनी बाप्पाचे स्वागत, भक्तिमय उत्साहाने शहर दुमदुमले
अकोट :अकोट शहरात विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे आगमन आज मोठ्या जल्लोषात,
भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने झाले.
सकाळपासूनच “गणपती बाप्पा मोरया” च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले.
यावेळी वरुणराजानेही हलक्या सरींचा वर्षाव करून
गणरायाचे स्वागत केल्याने वातावरण अधिक मंगलमय झाले.
ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात गणरायाच्या मूर्तींच्या मिरवणुका निघाल्या.
या मिरवणुकीत महिलांचा, लहानग्यांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
शहरातील कबुतरी मैदान परिसरात उभारलेल्या मूर्ती बाजारपेठा
दोन दिवसांपासून गणेशभक्तांसाठी आकर्षण ठरत होत्या.
लहान-मोठ्या, विविध भावमुद्रा आणि रंगसंगतीतील मूर्तींची खरेदी करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली.
शहरातील विविध गणेश मंडळांनी आकर्षक मंडप उभारून, रंगीबेरंगी लायटिंग,
देखावे आणि सजावटीसह गणेशोत्सवाची उत्सवी सुरुवात केली.
दिवसभर वाजतगाजत मिरवणुका निघाल्या आणि धार्मिक विधी,
पूजा-अर्चेनंतर गणरायाचे सभामंडपात व घरोघरी विधिवत स्वागत झाले.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अकोट नगरीत भक्तिभाव,
उत्साह आणि जल्लोषाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
read also:https://ajinkyabharat.com/shri-sant-gajanan-maharajancha-115-and-punyathi-utsav-lakhi-bhavikanchaya/