गँगस्टर रोहित गोदाराने पोलिसांना दिली धमकी

दिशा पाटनी प्रकरण: शूटर्सचा एन्काउंटर

दिशा पाटनी प्रकरण: शूटर्सचा एन्काउंटर

अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील शूटर्सचा एन्काउंटर उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणाच्या एसटीएफच्या संयुक्त पथकाने केला. या कारवाईत रवींद्र आणि अरुण या दोन आरोपी ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनीपतच्या दिशेने पाठलाग करताना या दोघांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देत त्यांचा एन्काउंटर केला. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी नकुल आणि विजय अद्याप फरार आहेत.गँगस्टर रोहित गोदाराने सोशल मीडियावर एन्काउंटरनंतर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने मारले गेलेले आरोपी “शहीद” असल्याचे म्हटले आहे आणि पोलिसांना थेट धमकी दिली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हे दोन्ही शूटर धर्मासाठी बलिदान दिले आहेत. सनातन धर्माची ही हार आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहेत, त्यांना कितीही श्रीमंत किंवा शक्तिशाली असले तरी सोडणार नाही.”रोहित गोदाराने सनातन धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या धंद्यांवरही टीका केली असून, या प्रकरणामुळे धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या गुन्हेगारी कारवाया अधिक तापू शकतात, अशी शक्यता आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गोल्डी बराड आणि रोहित गोदार यांचा गुन्हेगारी जाळे आतापर्यंत देशातील आठ पेक्षा जास्त राज्यांमध्ये पसरले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/varsha-patel-yanchi-inspiring/