हिरपूर – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी
हिरपूर गावात दणदणीत पथसंचलन (दि.२८) आयोजित करण्यात आले.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या प्रमुख सूचनांनुसार,
अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व मुर्तीजापूर
उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे यांच्या देखरेखीखाली हे पथसंचलन यशस्वीपणे पार पडले.
या पथसंचलनात मुर्तीजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुठ्ठे,
पीएसआय चंदन वानखडे, पीएसआय मनीषा सामातकर,
पोलीस अंमलदार शंकर खेडकर तसेच एस.आर.पी. प्लाटून व होमगार्ड जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य रस्ते, चौक व गल्लीबोळांतून शिस्तबद्ध संचलन
करताना पोलीस दलाने नागरिकांना शांतता, सलोखा आणि सुरक्षिततेचा ठोस संदेश दिला.
गणेशोत्सव काळात नागरिकांनी आनंदात आणि शांततेत सण साजरा करावा,
यासाठी पोलीस दल सतत सज्ज असल्याचा विश्वास या पथसंचलनातून निर्माण झाला.
गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या सुरक्षिततेच्या संदेशाचे स्वागत मनापासून केले.
Read also: https://ajinkyabharat.com/chelka-gavat-patravali-mukt-mahaprasad-traditional-citizen-enthusia/