गणेशोत्सव सुरळीत पार पडावा म्हणून पोलिसांचा तालुक्यात रूट मार्च

पोलिसांचा तालुक्यात दिमाखदार रूट मार्च

बाळापूर- गणपती उत्सव शांततेत व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी

याकरिता तालुक्यातील विविध ठिकाणी पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार हा रूट मार्च

काढण्यात आला असून यात मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड सहभागी झाले.

उरण पोलीस स्टेशनअंतर्गत ग्राम आगर येथे १ सप्टेंबर

रोजी दुपारी एक वाजता रूट मार्च घेण्यात आला.

पोलीस ठाणेदार पंकज कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय मुंडे,

पीएसआय काइंदे यांच्यासह २५ पोलीस कर्मचारी व २० होमगार्ड सहभागी झाले होते.

तर बाळापूर पोलीस स्टेशनअंतर्गत ग्राम मनारखेड येथे २ सप्टेंबर

रोजी दुपारी दोन वाजता ठाणेदार अनिल जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली

पीएसआय संभाजी हिवाळे यांच्यासह ४० पोलीस कर्मचारी व २० होमगार्ड यांच्या उपस्थितीत रूट मार्च काढण्यात आला.

याशिवाय २ सप्टेंबर रोजीच सकाळी २ ते २.३० वाजता ग्राम मनारखेड

येथे पुन्हा रूट मार्च पार पडला. या वेळी चार अधिकारी,

पोलीस स्टेशनचे ११ कर्मचारी, ट्रेकिंग फोर्सचे ९ कर्मचारी व १५ होमगार्ड सहभागी झाले होते.

गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये

याकरिता पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी दिसून आले.

Read also :https://ajinkyabharat.com/akot-talukat-jhalya-nikasanich-panchnam-karoon-tatka-madat-dya/