गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला – यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि शांततामय मार्गाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती, विसर्जन मार्गावरील प्रकाशयोजना, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि आरोग्य सुविधा यांसह सर्व सोयीसुविधा वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत विविध मंडळांच्या मागण्या व निवेदनांवर चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, रस्त्यांवरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरून काढले जातील.

महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी. तसेच, विसर्जन मार्गावर प्रकाश, पाणी, आरोग्य व सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात यावी.

दरम्यान, ईद-ए-मिलाद सण गणेशोत्सवाच्या कालावधीत असल्याने, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांकडून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील.

धार्मिक सौहार्द जपत सर्व सण शांततेत पार पाडावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

पर्यावरणपूरक उपक्रम राबवून शासनाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत जिल्ह्यातील मंडळांनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी सुचविले.

तसेच, ‘महावितरण’ने मंडळांकडून घेतलेल्या डिपॉझिटची रक्कम विहित वेळेत परत करण्याचे निर्देशही दिले.

नियोजन भवनात आयोजित बैठकीत खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार साजिदखान पठाण, आमदार अमोल मिटकरी,

आमदार वसंत खंडेलवाल, ॲड. मोतीसिंह मोहता, हाजी मुलाम, सिद्धार्थ शर्मा, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह अनेक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/state-production-inspector-in-cligra-drin/