गमावलेले प्रेम मिळवून देण्याच्या बहाण्याने १८ वर्षीय तरुणीची फसवणूक
मुंबई – “गमावलेले प्रेम २४ तासांत मिळवा” अशा भ्रामक जाहिरातींना बळी पडून दक्षिण
मुंबईतील १८ वर्षीय तरुणीची मोठी फसवणूक झाली. इंस्टाग्रामवर दिसलेल्या जाहिरातीवर विश्वास ठेवून
तिने घरातील १३ तोळे सोन्याचे दागिने आणि तीन लाख रुपयांची रोकड अशा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल गमावला.
घटनेत आरोपींनी ब्रेकअप झालेल्या तरुण-तरुणींच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत, “विशेष विधी करून
गमावलेलं प्रेम परत मिळवून देतो” असा विश्वास बसवला. यासाठी सोने-चांदी आणि रोकड लागेल असे सांगून मुद्देमाल उकळण्यात आला.
तरुणीने १ ऑगस्ट रोजी आरोपींना मुंबईत बोलावून दिलेला मुद्देमाल घेऊन गेले.
तक्रार मिळताच गुन्हे शाखेने राजस्थानच्या श्रीगंगानगर येथून दोघांना अटक केली.
या टोळीने महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा यासह इतर राज्यांतही अशा प्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले आहे.