गजानन पोहनकर यांचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरव
बोरगाव मंजू:५ सप्टेंबर रोजी देशभरात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर परशुराम नाईक विद्यालय, बोरगाव मंजू येथेही शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या शुभसंधीला शाळेच्या संचालक मंडळाने विशेष रंगत आणली आणि शाळेसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केला.
या वर्षीच्या विशेष सन्मान योजनेत शाळेचे उपमुख्याध्यापक गजानन पोहनकर यांचा अभिनव सत्कार करण्यात आला.
संचालक मंडळाच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला.
उपमुख्याध्यापक पोहनकर हे अनेक वर्षांपासून परशुराम नाईक विद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षक, उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक अशा सर्व महत्वाच्या पदांवर उत्तम कामगिरी बजावली आहे.
त्यांच्या संयमी, शांत आणि विद्यार्थ्यांशी मनमिळाऊ संवादाच्या शैलीमुळे शाळेत त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
त्यांची विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी, कार्यप्रतिक्रिया आणि शाळेच्या उन्नतीसाठी असलेले योगदान यामुळे शाळेच्या संचालक मंडळाने त्यांना ‘उत्कृष्ट शिक्षक २०२५’ हा पुरस्कार प्रदान केला.
तसेच, शाळेतील सर्व शिक्षकांना संचालक मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय पजई यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री रमेश भड यांनी सादर केले.
कार्यक्रमात बोरगाव मंजू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री किरण नाईक, सदस्य श्री बोरगावकर, श्री श्याम देशमुख, सचिव श्री नाजूकराव गमे, श्री के. एम. जोशी, सुधाकरराव टोबरे, प्राचार्य मनोज आगरकर, पर्यवेक्षक श्री भदे तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
अशा अभिनव उपक्रमातून शिक्षक दिनाच्या महत्वाची जाणीव होत असून शिक्षकांच्या समर्पित कार्याची सर्वत्र दखल घेतली जात आहे.
read also :https://ajinkyabharat.com/gunhagarachi-jat-dharma-aani-paksha-dasato-then-accused-accused/
