अंतराळात 18 दिवसांचा रोमांचकारी प्रवास केल्यानंतर भारतीय गगनवीर शुभांशु शुक्ला व त्यांच्या
तीन सहकाऱ्यांचा पृथ्वीवर सुरक्षित पुनरागमन झाला आहे.
‘ड्रॅगन ग्रेस’ यानाने दक्षिण कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात यशस्वी लँडिंग केली.
310 वेळा पृथ्वीची परिक्रमा करत त्यांनी 1.3 कोटी किमीचा प्रवास पूर्ण केला.
अंतराळातून बाहेर पडल्यानंतर त्यांची पहिली झलक जगासमोर आली असून, सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
स्पेसएक्सच्या जलद नौकांद्वारे ते सुरक्षितपणे कॅप्सूलमधून बाहेर काढण्यात आले.
यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणी आणि 7 दिवसांचा पुनर्वसन कार्यक्रम दिला जाणार आहे.
विशेष माहिती:
-
मिशन ‘एक्सिओम-4’ अंतर्गत शुक्ला यांचा सहभाग
-
22.5 तासांचा प्रवास करून परतले पृथ्वीवर
-
हीट शील्ड आणि पॅराशूटच्या सहाय्याने यानाचे सुरक्षित अवतरण
-
काही दिवस गुरुत्वाकर्षणाशी सवयीसाठी ‘रिहॅब’मध्ये राहतील
शुभांशु शुक्ला यांची ही कामगिरी भारतातील नव्या अंतराळ युगाची सुरुवात असल्याचे मानले जात आहे.
भारतासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/praveen-gaikwad-yanchayavari-bhayad-hallyacha-sambhaji-brigade/