गाडेगावमध्ये बकरीला वाचवताना इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू

बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात एक इसमाचा करुण मृत्यू झाल्याची घटना

गावात पसरली शोककळा

तेल्हारा -तालुक्यातील गाडेगाव येथे बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात एक इसमाचा करुण मृत्यू झाल्याची घटना घडली.

संजय सदाशिव वानखडे हे सोमवारी सकाळी बकऱ्यांना चारण्यासाठी गावाजवळील आस नदीच्या काठावर गेले होते.

दरम्यान, एक बकरी चरत असताना नदीच्या काठावरून घसरून पाण्यात पडली.

हे पाहताच संजय वानखडे बकरीला वाचविण्यासाठी नदीत उतरले.

त्यांनी बकरीला तर सुरक्षित बाहेर काढले, मात्र स्वतःचा जीव मात्र गमावला. पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने ते बुडाले.

घटनेची माहिती मिळताच तेल्हारा तहसीलदार सोनवणे यांनी तातडीने प्रशासनाला सतर्क केले.

आडसुळ येथील बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन पाण्यातून मृतदेह बाहेर काढला.

या दुःखद प्रसंगामुळे गाडेगाव परिसरात शोककळा पसरली असून तेल्हारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/district-magistrate-office/