गाणं गाताना भावुक व्हायचा भाईजान

‘तेरे नाम’च्या सेटवर रडायचा सलमान खान!

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपनंतर सलमानच्या आयुष्यातील सर्वात भावनिक काळ समजला जाणारा कालखंड म्हणजे ‘तेरे नाम’ सिनेमाचा काळ. नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत प्रसिद्ध गीतकार समीर अंजान यांनी सलमानच्या भावनिक अवस्थेबद्दल मोठा खुलासा केला आहे.समीर अंजान यांनी सांगितले की, “तेरे नाम” सिनेमातील टायटल ट्रॅक – ‘क्यों किसी को वफा के बदले वफा नहीं मिलती…’ हे गाणं सलमानच्या आयुष्यातील त्या वेदनेतून जन्माला आलं. ऐश्वर्या रायसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमान या गाण्याशी भावनिकरीत्या जोडला गेला होता. शूटिंगपूर्वी तो सतत हे गाणं गात असे आणि डोळ्यांत अश्रू येत असत.समीर यांच्या मते, सलमान नेहमी संगीतकार हिमेश रेशमियाला बोलवत असे आणि म्हणत असे, “मला हे गाणं ऐकव, कारण हे माझ्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे.” या गाण्यात त्याची वेदना, तुटलेलं प्रेम आणि एकाकीपणा दिसून येतो. ‘तेरे नाम’ सिनेमा 2003 मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमात सलमानसोबत अभिनेत्री भूमिका चावला मुख्य भूमिकेत होती. संगीतकार हिमेश रेशमिया यांनी दिलेल्या संगीताला उदित नारायण आणि अल्का यागनिक यांचा गोड आवाज लाभला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर फक्त गाणीच नाही, तर सलमानची हेअरस्टाईलही तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. असंख्य तरुणांनी त्या काळात सलमानसारखी स्टाईल केली होती.आजही सलमान खान त्याच्या व्यावसायिक यशाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. ऐश्वर्या रायसोबतचं त्याचं नातं चाहत्यांना आजही आठवतं. एकेकाळी बॉलिवूडचं ‘आयकॉनिक कपल’ म्हणून ओळखले जाणारे हे दोघे, शेवटी वेगळे झाले आणि त्या नात्याचा शेवट सलमानसाठी अत्यंत वेदनादायक ठरला. ‘तेरे नाम’ मधील त्याची भूमिका आणि गाणी आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. सलमानची ही भावनिक कथा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अजून एक वेगळा पैलू उलगडते.

read also:https://ajinkyabharat.com/pratisa-asalelya-or-temple-year-old-bhaktanchi-mandiai/