तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी, अजिंक्य भारत, सम्यक संबोधीचे आयोजन,
तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अजिंक्य भारत , सम्यक संबोधी द्वारा प्रस्तुत तिक्ष्णगत सदस्य टीम व अकोला डान्स स्टुडिओ यांचा फ्लॅश मॉब देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील प्रमुख चौकांमध्ये आयोजित करण्यात आला होता. तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अजिंक्य भारत व सम्यक संबोधि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक डॉ.सुगत वाघमारे यांच्या सूचनेनुसार तथा तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे मुख्य सल्लागार ऍडव्होकेट संजयजी सेंगर , सचिव विष्णुदास मोंडोकर व सम्यक संबोधी सचिव राहुल ओईंबे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील सम्यक संबोधी रणपिसे नगर, जठार पेठ चौक, टॉवर चौक, मुख्य बस स्थानक चौक, सिविल लाईन चौकात याचे सादरीकरण करण्यात आले. स्वातंत्र्य दिन पाहता नृत्याच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतांवर कलावंतांनी आकर्षक नृत्य सादर केले. या सोबतच नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूर वर आधारित एक नृत्य नाटिका कलावंतांनी सादर केली. प्रत्येक चौकात शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलावंतांचे टाळ्या वाजून मनोबल वाढवले. काही नागरिकांनी तर आपल्या मोबाईल मधून हा कार्यक्रम आपल्या कॅमेरात कैद केला. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांना मिळताच त्यांनी सिव्हिल लाईन चे पोलीस निरीक्षक मालती कायटे यांना सिविल लाईन चौकात पाठवून तिक्ष्णगत संस्थेचे जिल्हा समन्वयक यांच्याशी संपर्क करीत सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये एसपी महोदयांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून हा कार्यक्रम बघितला व ऑपरेशन सिंदूर सह देशभक्तीपर गीतावरील नृत्य करणाऱ्या सर्वच कलावंतांचे तोंड भरून कौतुक केले. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्याला तिक्ष्णगत संस्थेद्वारे चांगला उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे सुद्धा कौतुक जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले. या फ्लॅशमॉब करिता तिक्ष्णगत संस्थेचे टीम कोरिओग्राफर अनित कुरिल, करण पळसपगार, अकोला डान्स स्टुडिओचे कोरिओग्राफर विनय गौसर, राहुल सारवान, यांच्यासह तिक्ष्णगत संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, अजिंक्य भारतचे समूहाचे सदस्य, सम्यक संबोधी संस्थेचे सदस्य, यांनी परिश्रम घेतले.
READ ALSO: https://ajinkyabharat.com/purchaya-function-waunon-veteran/