माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि
हिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे.
सूर्यकांता पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच हदगाव विधानसभा संयोजक पदाचा
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
राजीनामा दिला आहे. सूर्यकांता पाटील यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला हिंगोली व नांदेड
जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. सूर्यकांता पाटील यांनी त्यांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अॅड.
किशोर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या अनेक दिवसांपासून सूर्यकांता पाटील यांनी आपली
परखड मते व्यक्त केली होती. त्यानंतर आता पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
सूर्यकांता पाटील यांनी चार वेळा खासदार, एक वेळा आमदार म्हणून हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे
प्रतिनिधित्व केले. आपण आपला राजीनामा स्वखुशीने देत असल्याचे सूर्यकांता यांनी स्पष्ट केलं आहे.
अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर सूर्यकांता पाटील यांनी परखड मत व्यक्त केले होते. अशोक चव्हाणांमुळे भाजपाचा पराभव झाला नाही. उलट भाजपत येऊन अशोक चव्हाण यांनी स्वतःच नुकसान करून घेतलं, असे विधान पाटील यांनी केलं होतं.
‘मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा देत आहे.
आपल्या सोबत गेल्या १० वर्षात खूप काही शिकता आले. तालुक्यात बुथ कमीटीपर्यंत काम केले.
आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली व भारतीय जनता पार्टीची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे.
प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही.
कोणतीही कटुता मनात न ठेवता राजीनामा देत आहे तो स्विकारावा हि नम्र विनंती’
असे या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
१९७२ मध्ये भाजप महिला आघाडी प्रमुख म्हणून सूर्यकांता पाटील यांनी त्यांचा राजकीय प्रवास सुरु केला होता.
त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन नगरसेवक ते खासदार अशी पदे भूषवली.
त्यानंतर पाटील या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्या. यानंतर २०१४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
नांदेड लोकसभा मतदारसंघातून सूर्यकांता पाटील यांनी निवडणूक लढविली होती.
त्यानंतर हदगाव विधानसभा मतदारसंघातही त्यांनी निवडणूक लढविली होती.
त्यानंतर त्या केंद्रात ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.