परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार

SCO शिखर परिषदेत सहभागी होणार

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानमध्ये आयोजित

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या बैठकीत सहभागी होणार

Related News

आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 15

आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये SCO शिखर परिषदेचे

आयोजन करण्यात आले आहे. शांघाय कोऑपरेशन

ऑर्गनायझेशन च्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट चे

अध्यक्षपद यंदा पाकिस्तानकडे आहे. त्यानुसार, पाकिस्तानने 15

आणि 16 ऑक्टोबररोजी SCO शिखर परिषदेचे आयोजन केले

आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र

मोदी यांना शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीचे

निमंत्रण पाठवले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या

प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितले की, 15-16

ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी सदस्य

देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याअंतर्गत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले

आहे. काही देशांनी या बैठकीत सहभागी होण्याची पुष्टी केली आहे,

त्याबाबतची माहिती योग्य वेळी दिली जाईल. इस्लामाबादमध्ये

होणाऱ्या या शिखर परिषदेपूर्वी, एक मंत्रीस्तरीय बैठक आणि

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अनेक फेऱ्या होतील, ज्यामध्ये

SCO सदस्य देशांमधील आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक आणि

मानवतावादी सहकार्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. दरम्यान, SCO

मध्ये भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान,

ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. भारताने

गेल्या वर्षी व्हर्चुअल मोडमध्ये SCO शिखर परिषदेचे आयोजन

केले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ ऑनलाइन

सहभागी झाले होते. पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री

बिलावल भुट्टो झरदारी यांनी मे 2023 मध्ये गोव्यातील परराष्ट्र

मंत्र्यांच्या SCO परिषदेच्या 2 दिवसीय बैठकीला सहभाग

नोंदवला होता. ते जवळपास 12 वर्षात भारताला भेट देणारे पहिले

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री होते.

Read also: https://ajinkyabharat.com/rain-will-become-active-again-from-6th-october/

Related News