फुटलेला रस्त्यामुळे होतो नागरिकांना त्रास !

फुटलेला रस्त्यामुळे होतो नागरिकांना त्रास !

चंदन जंजाळ

बाळापूरः- गेल्या दोन वर्षापासून वाडेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जलजीवन मिशन चे काम

कधी चालू तर कधी बंद राहते त्यामुळे गावातील मुख्य रस्ता खोदल्यामुळे त्यामधील सळई बाहेर निघलेले आहेत .

Related News

आठवडी बाजारात जात असताना मोठ्या प्रमाणात निघालेल्या सळईमुळे ४० वर्षीय महिलाचा सळई मध्ये पाय अडकून

जोरात आपटल्याने चांगलीच दुखापत झालेली आहे तसेच गावातील प्रत्येक गल्ली मधली रस्त्याचे खोदकाम

करून वरच्यावर काम केल्याने रस्त्याने चालणे झाले अवघड पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी गड्डे पडलेले आहेत.

त्यामधील सळई दिसून येत नाही मुख्य रस्त्याने जात असताना शाळेकरी विद्यार्थ्यांना त्या बर्थडे चा अंदाज येत नसल्याने कित्येकदा

विद्यार्थी त्या खड्ड्यामध्ये पडल्याचे दिसून आले आहे या अगोदर सरपंच सचिवाना वारंवार सांगून सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष दिले.

नाही आता तरी काम करतील का अशी चर्चा गावात होत आहे खुदलेल्या रस्त्यावर विटा तर रेती पडलेली असल्याने बाजारात जात

असताना रस्त्याने चालताना खूप मोठा त्रास निर्माण होत आहे.

आठवडी बाजाराचा लिलाव करून ग्रामपंचायतला मोठा पैसा गोळा केला जातो परंतु गावातील मुख्य रस्त्याकडे लक्ष दिले जात नाही

जलजीवन मिशन चे संबंधित ठेकेदार जाणीवपूर्व दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे किमान

आठवडी बाजारात जाण्याचा रस्ता काँग्रॅटीकरण झाला पाहिजे अशा भावनेचा सूर गावातून निघत आहे.

Read Also :   https://ajinkyabharat.com/nimbolichya-usable-chemical-free-coat/

Related News