फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;

फ्रंटियर एअरलाइन्सच्या विमानाच्या इंजिनाला लागली आग

फ्लोरिडा | १७ एप्रिल २०२५

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ऑरलॅंडो विमानतळावर (MCO) एक भयंकर अपघात टळला असून,

फ्रंटियर एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये उड्डाणाच्या वेळी अचानक इंजिनाला आग लागल्याची घटना घडली.

Related News

ऑरलॅंडोहून सॅन जुआन (SJU) कडे जाणाऱ्या A320-251NP फ्लाइटच्या डाव्या बाजूच्या इंजिनात ही घटना घडली.

लँडिंगच्या वेळी फ्रंट लँडिंग गिअरमध्ये मोठी बिघाड झाल्याने विमानाचे एक चाक तुटले आणि त्यामुळेच इंजिनात आगीचा भडका उडाला.

प्रवाशांचे भयावह अनुभव

या भयावह प्रसंगाचे वर्णन करताना प्रवासी मेलानी गोंजालेज व्हार्टन यांनी सोशल मीडियावर लिहिले की,

त्या काही मिनिटांत वाटलं की आता आपली कहाणी याच पृथ्वीवर संपणार आहे.

त्यांनी एक व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे, ज्यामध्ये विमानाच्या खिडक्यांबाहेर धुराचे लोट दिसत आहेत

आणि प्रवासी घाबरलेल्या आवाजात रडताना आणि प्रार्थना करताना ऐकू येत आहेत.

चार वेळा विमानतळावर फेरफटका, सुरक्षित लँडिंग

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने चार वेळा विमानतळावर फेरी मारल्यानंतर रात्री १०:२० वाजता

(स्थानिक वेळेनुसार) सुरक्षित लँडिंग करण्यात यश मिळवले. या संपूर्ण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्रवाशांना विमानातून टॅक्सीवेवर उतरवण्यात आले आणि बसद्वारे टर्मिनलपर्यंत नेण्यात आले.

फ्रंटियर एअरलाइन्सकडून अधिकृत प्रतिक्रिया

फ्रंटियर एअरलाइन्सने फॉक्स न्यूज डिजिटलला दिलेल्या निवेदनात सांगितले की,

विमान सुरक्षितरित्या उतरवण्यात आले असून प्रवासी आणि पायलट ग्रुप या घटनेत सुरक्षित आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/jharkhandchaya-ranchimadhya-pahlyandach-air-show/

Related News