अटल सेतूमुळे 60 टक्के मासे कमी झाल्याचा मच्छिमार संघटनेचा आरोप

नुकसान भरपाईसाठी हायकोर्टात धाव

अटल सेतूमुळे रस्तेमार्ग वेगवान झाले असले तरी मासेमारीवर अवलंबून असलेल्यांच्या

रोजगारावर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.

Related News

मच्छिमार संघटनेने त्याविरोधात आवाज उठवत मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

सरकारने त्याबदल्यात नुकसानभरपाई द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

या याचिकेवर येत्या 28 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

अटल सेतूमुळे वाशी खाडीतील तब्बल 60 टक्के मासे कमी झाल्याचा आरोप

मच्छिमार संघटनांनी केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या उत्पनात घट झाली आहे.

सरकारने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, त्याबाबतची याचिका

मच्छिमार संघटनेनेमुं बई हायकोर्टात दाखल केली आहे.

दाखल यांचिकेत वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैराणे, घणसोली, गोठीवली,

दिवा व बेलापूर येथील कोळीवाड्यांचा देखील समावेश आहे.

मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

याचिकेवर न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनावाला

यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे.

2018 पासून अटल सेतूच काम सुरू झालं. मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा

अटल सेतू 21.8 किमी अंतराचा आहे. बांधकाम सुरू झाल्यापासून

मच्छीमार संघटनांनी मासेमारी घटल्याचं म्हटलं होतं.

असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/supriya-sule-case-registered-against-unknown-person-by-pune-police-in-whatsapp-hack-case-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87/

Related News