बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा
पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची
रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवर गोळीबार केला. यात दोन
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या
गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता
विविध आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता याप्रकरणी पहिल्यांदाच
पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नेमकं काय
घडलं? याबद्दलचा खुलासा केला. अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी
ठाणे पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश
साळवी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत
त्यांनी याप्रकरणातील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. तसेच
सध्या या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून केला जात आहे,
असेही पोलिसांनी सांगितले. काल जी घटना घडली आहे, त्याबद्दल
एक अपडेट देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. काल
बदलापुरातील बाल लैंगिक अत्याचारातील अटक आरोपी अक्षय
शिंदे याच्याविरुद्ध बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा
दाखल झाला होता. अक्षय शिंदेंच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध तक्रार
केली होती. याप्रकरणी एक विशेष तपास पथक तयार करण्यात
आले होते, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
या तपास पथकातील अधिकारी काल न्यायालयाचे ट्रान्सफर वॉरंट
घेऊन कायदेशीररित्या आरोपीचा ताबा घेण्यासाठी तळोजा
मध्यवर्ती कारागृहात गेले होते. तिथून त्याला घेऊन येत असताना
या आरोपीने पोलिसांचे पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत
असताना जी घटना घडली, त्याबद्दल मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार २६२, १३२, १०९, १२१
या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात
आरोपीच्या मृत्यूनंतर अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल करण्यात
आलं आहे. या दोन्हीही प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस आयुक्त
करत आहेत, असेही ठाणे पोलीस यावेळी म्हणाले.