महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे
जनजीवन विस्कळीत झालं असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
Related News
पहलगाम हल्ल्यानंतर संताप उफाळला
दिल्ली मेट्रोत iPhone 16 चोर पकडला
🇮🇳 पाकिस्तानला जमीन ते आकाश ‘नो एंट्री’
पीडित कुटुंबांना ५० लाखांचं अर्थसहाय्य
18 वर्षांचं IPL, 14 वर्षाच्या पोराचा थरारक कारनामा!
दिल्ली सरकारचा मोठा निर्णय!
अकोल्यात महिला चोर पकडली….
दिल्लीतील तापमानात प्रचंड वाढ
ATM शुल्कात वाढ
पूर्व विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा
उपग्रह प्रकल्प अवकाशात
‘माझा मुलगा तुमच्या मनोरंजनासाठी नाही’
त्यामुळे, अनेक जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.
दुसरीकडे आंध्र प्रदेशातही मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांना
पूर आला आहे. त्यामुळे, नद्यांजवळील गावातील नागरिकांची स्थलांतर
करण्यात आले. येथील नागरिकांच्या सेवेत आता सैन्य दलानेही पुढाकार
घेतल्याचं दिसून येते. राज्यातील पूरग्रस्त परिसरात लोकांना जेवण पुरविण्यासाठी
सैन्य दलाच्या माध्यमातून अभिनव आणि माणूसकीचं काम केलं जातंय.
येथील अनेक भागात ड्रोनद्वारे आणि सैन्याच्या हेलिकॉप्टरमधून जेवण
पोहोचवण्यात येत आहे. विशेष म्हणजे ड्रोनद्वारे जेवण पोहोचविण्याचा
हा पहिलाच प्रयत्न आहे. जेथे बोट किंवा हेलिकॉप्टरचा वापर अश्यक आहे,
तेथे ड्रोनच्या मदतीने पूरग्रस्तांना अन्न पुरवलं जात आहे.
आंध्र प्रदेशमधील पूरग्रस्त भागात अन्न, पाणी आणि औषधांचा पुरवठा
ड्रोनद्वारे करण्यात आला आहे. या ड्रोनद्वारे जवळपास 8 ते 10 किलो
वजनाचे साहित्य व पदार्थ पाठवण्यात यश आले आहे. त्यामध्ये, अन्न, पाणी
आणि औषधांचा साठा आहे. त्यामुळे, पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना
मोठा दिलासा मिळाला आहे. येथील अधिकाऱ्यांनी या पदार्थांची पाठवणूक
करण्यासाठी 15 पेक्षा जास्त ड्रोनची व्यवस्था केली आहे.
याबाबत मंत्री लोकेश यांनी माहिती देताना म्हटले की, पूरग्रस्त भागातील
नागरिकांच्या मदतीसाठी व गरजेच्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी
ड्रोनचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे पूरग्रस्त भागातील नागरिकांना
ड्रोनद्वारे अन्न पुरवठा करण्याची ही देशातील पहिलीच वेळ
असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Read also: https://ajinkyabharat.com/jammu-kashmir-bjp-releases-fourth-list-of-6-candidates/