चेंबूरमध्ये अग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

मुंबईतील चेंबूर परिसरात भीषण आग लागली आहे. चेंबूर

परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आग

लागली. या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला.

Related News

सध्या अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले असून या

ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेच्या

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सिद्धार्थ

कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली घराला पहाटे

५.१५च्या दरम्यान आग लागली. या घराच्या तळमजल्यावर एक

दुकान होते. या दुकानाच्या इलेक्ट्रीक वायरिंग आणि सामनाला

सुरुवातीला आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेली. यात

तळमजल्यावर दुकान होते आणि वरच्या मजल्यावर एक कुटुंब

राहत होते. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून

मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा आणि 10 वर्षांच्या

मुलाचाही समावेश आहे. पॅरिस गुप्ता (7), मंजू प्रेम गुप्ता (30),

अनिता प्रेम गुप्ता (39), प्रेम गुप्ता (30), नरेंद्र गुप्ता (10), विधी

गुप्ता (15), गितादेवी गुप्ता (60) अशी मृत व्यक्तींचे नावे आहेत.

ही आग शॉक सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला

जात आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/vegetarianism-mahagala/

Related News