भीषण अपघात; सर्वजण सुखरूप”

भीषण

 देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी 8 सप्टेंबर रोजी मतदान करून डॉ. प्रशांत पडोळे विमानाने मुंबईत परतले. कार्यालयीन कामकाज पूर्ण करून भंडाऱ्याकडे जात असताना, नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ त्यांच्या फॉर्च्युनर वाहनाला अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे जोरदार धडक बसली.या भीषण अपघातात खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले, परंतु त्यांचे सहकारी आणि चालक सुरक्षित आहेत. वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी धावले. अपघातानंतर वाहन रस्त्याच्या कडेला हलवण्यात आले आणि पुढील चौकशी सुरू आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचा बराचसा भाग नक्षलप्रभावित असल्याने, खासदारांना अद्याप पुरेशी शासकीय सुरक्षा न मिळाल्याने या अपघातानंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याचे आवाहन केले आहे.सुदैवाने, डॉ. पडोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रकृती सुखरूप असून तातडीने उपचार देण्यात आले आहेत.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/journalist-naman-naveen-executive-jaheer/