अमेरिकेनं भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावल्याने दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीन आणि रशिया संदर्भात मोठा दावा केला आहे.ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा एकत्रित फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “चीनमुळे आम्ही भारत आणि रशियाला गमावलं आहे. आशा आहे की त्यांची ही मैत्री दीर्घकाळ टिकेल आणि एक समृद्ध भविष्य घेऊन येईल.”दरम्यान, ट्रम्प यांच्या या पोस्टवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला. मंत्रालयाने “आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही” असं स्पष्ट केलं.टॅरिफ वादामुळे अमेरिका-भारत संबंध तणावपूर्ण झाले असतानाच, दुसरीकडे भारत, चीन आणि रशिया यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. नुकत्याच चीनमध्ये पार पडलेल्या एससीओ बैठकीत पंतप्रधान मोदी आणि पुतिन सहभागी झाले होते. तसेच ३ सप्टेंबर रोजी झालेल्या चीनमधील सैन्य परेडलाही पुतिन उपस्थित होते. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/hivarkhedamidhye-gharguti-ganpatinte-shantate-visarjan/