फक्त दोन दिवसांत कमाई 2.2 कोटी रुपये

‘दशावतार’ने प्रेक्षकांच्या मनावर ठसा

‘दशावतार’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावतोय. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट कोकणातील समृद्ध संस्कृती व परंपरांचे चित्रीकरण करत लोकप्रिय होत आहे.

१२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ने पहिल्या दिवशी 58 लाख रुपयांची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 1.39 कोटी रुपये कमावून दोन दिवसांत एकूण 2.2 कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस कलेक्शन केला आहे.

‘कोकणातला कांतारा’ म्हणून चर्चेत आलेला हा चित्रपट, विशेषतः गणेशोत्सवासोबत साजरा होणाऱ्या दशावतारी नाट्यकलेवर आधारित असून कोकणातील निसर्गवैभव व परंपरांचे सजीव चित्रण करत आहे.

लेखक-संचालक सुबोध खानोलकर यांनी पटकथा व दिग्दर्शन केले असून गुरु ठाकूर यांनी संवाद व गीतलेखन केले आहे. सध्या माऊथ पब्लिसिटीमुळे वीकेंडच्या कमाईत अधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे.

read also :https://ajinkyabharat.com/cancellation-of-hanyachi/