फरीदाबाद रेल्वे स्टेशनवर मोठा अपघात;

फरीदाबाद रेल्वे स्टेशनवर मोठा अपघात; बेसमेंटची माती कोसळली, दोन महिला मजुरांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले

फरीदाबाद (हरियाणा) – ओल्ड फरीदाबाद रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी दुपारी मोठा अपघात घडला.

स्टेशनच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या खोदकाम

दरम्यान अचानक माती कोसळल्याने अनेक मजूर ढिगाऱ्याखाली दबले.

यामध्ये दोन महिला मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर इतर काही मजूर गंभीर जखमी आहेत.

दुपारी १२.३० च्या सुमारास घटना

स्टेशनच्या नूतनीकरणाचं काम सुरू असून त्या अंतर्गत बेसमेंटच खोदकाम केल जात होती.

दुपारी सुमारे १२.३० वाजता अचानक बेसमेंटची माती भरभराट कोसळली आणि काम करणारे मजूर त्याखाली दबले.

त्यात दोन महिला मजुरांचा मृत्यू झाला असून इतरांचा शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

रेस्क्यू ऑपरेशन सुरू

घटनेनंतर तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं.

जेसीबी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

जखमींना फरीदाबादच्या जिल्हा नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही मजुरांची प्रकृती गंभीर आहे.

प्रशासन आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी

अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे.

बेसमेंटमध्ये काम करताना सुरक्षेच्या उपाययोजना किती होत्या, याचा तपास सुरू आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindurwaron-inspired-special-banarasi-sari/