महिला रक्षणासाठी प्रसिद्ध भुजली उत्सव साजरा
ढोल-ताशांच्या गजरात काढली मिरवणूक, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
आकोलखेड : रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा भुजली उत्सव यंदाही जल्लोषात पार पडला.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीची सुरुवात झाली.
महिलांनी सजवलेल्या रंगीबेरंगी भुजली टोपल्यांनी संपूर्ण वातावरण उत्साहवर्धक बनले.
ज्या महिलांनी भुजली आकर्षक व सुंदर सजवली होती, त्यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
महिलांचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला नदीपात्रात भुजलीचे विसर्जन करण्यासाठी जमल्या.
पुरुषांचादेखील कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग होता.
इतिहासानुसार, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यावर असंख्य महिला हातात टोपल्या घेऊन मार्गस्थ झाल्या.
एका टोपलीत भुजली होती. सैन्यांनी विचारले, “ये क्या है?” त्यावर महिलांनी उत्तर दिले, “ये हमारी भुजली है, और नदी में जाकर बहाना है.”
त्या काळापासून क्षत्रिय उच्चवर्णीय समाजात ही परंपरा आजतागायत सुरू आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/trump-yancha-50-turiff-plan-fail-honyachaya-margawar/