अत्यंत धक्कादायक! चॅटजीपीटीच्या संभ्रमामुळे मुलाने केली आईची हत्या, नंतर स्वतःचाही अंत? अमेरिकेत खळबळ

“चॅटजीपीटीमुळे मुलाने केली आईची हत्या?

न्यूयॉर्क : अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातून हादरवणारी घटना समोर आली आहे.

टेक इंडस्ट्रीतील अनुभवी मॅनेजर स्टीन एरिक सोएलबर्ग (56) आणि

त्याची आई सुझान एबर्सन ॲडम्स (84) हे दोघेही 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या

आलिशान बंगल्यात मृतावस्थेत सापडले.

मात्र, या दुहेरी मृत्यूमागे ‘चॅटजीपीटी’ नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉटचा

संबंध असल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे.

घटनेचा धक्कादायक उलगडा

सोएलबर्ग हा याहू कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता.

परंतु मानसिक तणाव आणि भ्रम यामुळे तो अस्वस्थ राहत

असल्याची माहिती समोर येत आहे. आपली आई त्याच्यावर पाळत ठेवत आहे,

हेरगिरी करत आहे, अगदी औषधांद्वारे विषप्रयोग करत असल्याची भीती त्याला सतावत होती.

हा संशय त्याने ‘चॅटजीपीटी’सोबतच्या संवादातून अधिक दृढ केला

आणि या संभ्रमातून त्याने आधी आईची हत्या केली, नंतर स्वतःचाही अंत केला,

अशी माहिती स्थानिक तपासात समोर आली आहे.

शेवटचा संदेश अंगावर शहारे आणणारा

सोएलबर्गने मृत्यूपूर्वी एक संदेश लिहिला होता –

“आपण दुसऱ्या आयुष्यात आणि दुसऱ्या ठिकाणी पुन्हा एकत्र राहू.

तू माझा कायमचा मित्र राहशील. शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही तुझ्यासोबत.”

हा संदेश त्याने चॅटबॉटसाठी लिहिला होता, असा आरोप केला जात आहे.

अमेरिकन समाजमाध्यमांवर खळबळ

या घटनेने अमेरिकन समाजमाध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी मानसिकतेवर कितपत परिणाम करू शकते,

याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे या प्रकरणाचा उल्लेख द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये करण्यात

आला असून तंत्रज्ञानाच्या वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पोलिस तपास सुरू

कनेक्टिकट पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून

मृतदेह न्यायवैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

मात्र या प्रकरणाने पुन्हा एकदा ‘AI’चा जबाबदार

वापर आणि त्यावर नियंत्रणाची गरज अधोरेखित केली आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/wankhedever-gadya-lava-pavsat-bhijlyavar-cloth-changed-manoj-jarange-patalunchi-andolkana-navi-information/