उत्कृष्ट गणेश मंडळाला पारितोषिक – अकोट ग्रामीण पोलिसांचा उपक्रम

पोलिसांतर्फे उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा

अकोट: गणेशोत्सवाचे औचित्य साधत अकोट

ग्रामीण पोलिस स्टेशनतर्फे उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा 2025

आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा अकोट तालुक्यातील सर्व गणेश मंडळांसाठी खुली असून,

लोकसहभागातून उत्सवात शिस्त, पर्यावरणपूरक उपक्रम

आणि सामाजिक भान जोपासण्याचा संदेश देण्याचा उद्देश आहे.

ही संकल्पना अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक

यांच्या प्रेरणेने साकारली असून,

अकोट पोलिस उपविभागीय अधिकारी निखिल पाटील

यांच्या मार्गदर्शनाखाली व अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर जुनघरे

यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा घेतली जात आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी पोलिस उपनिरीक्षक

मीना काटोलेसचिन कुलट यांच्याशी किंवा गोपनीय विभागाशी संपर्क साधावा,

असे सांगण्यात आले आहे.

अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनकडून आवाहन करण्यात आले आहे की,

यंदाचा गणेशोत्सव अनुशासनबद्ध व सामाजिक बांधिलकी जोपासणारा ठरेल.

उत्कृष्ट ठरणाऱ्या गणेश मंडळाला पारितोषिक दिले जाईल.

सर्व मंडळांनी पर्यावरणपूरक उपक्रमांचा अवलंब करण्याचे विशेष आवाहन करण्यात आले आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/akhher-tondi-assurance-sutle-degaon-yethil-accession/