विदेशातही जपली वारकऱ्यांनी महाराष्ट्राची परंपरा, दुबईत संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर

अकोट: महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा १७ नोव्हेंबर रोजी दुबई येथे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्तिकी वद्य त्रयोदशीच्या तिथीला आलेल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील वारकरी भाविक दुबई दौऱ्यावर होते.

सोहळ्याचे औपचारिक आयोजन ह. भ. प. गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले, त्यानंतर संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथ व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाविकांनी भक्तीभावाने आरती केली तर प्रा. माया म्हैसने यांनी पसायदान केले.

वारकऱ्यांनी “हे विश्वचि माझे घर” या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शिकवणीप्रमाणे आपल्या अध्यात्म व संस्कृतीचे जतन करत, पारंपरिक वारकरी पोशाखात हा सोहळा साजरा केला. या सोहळ्याला महाराष्ट्रातील भाविकांसह विदेशी पर्यटकांनीही हजेरी लावली, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक लक्षवेधी ठरला.

Related News

ह. भ. प. गणेश महाराज शेटे परमहंस आंतरराष्ट्रीय यात्रा कंपनीद्वारे चारधाम यात्रेसह भाविक भक्तांना विजय दौऱ्याद्वारे आणतात. दुबईतील या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी संजीवन समाधी सोहळ्याचे विशेष आयोजन केले होते, ज्यामुळे हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी झाला.

read also : https://ajinkyabharat.com/krantisurya-birsa-mundas-life-work-and-tribal-contributions-have-earned-him-significant-recognition-in-schools/

Related News