इन्स्टावर प्रेम, पैशांवरून वाद… अखेर प्रियकराच्या हातून 52 वर्षीय महिलेची झुडपांमध्ये हत्या
मैनपुरी – सोशल मीडियावरील प्रेमाने पुन्हा एकदा रक्तरंजित वळण घेतलं आहे.
इंस्टाग्रामवर झालेली ओळख, प्रेम,
पैशांचे व्यवहार आणि लग्नाचा दबाव अखेरीस खुनापर्यंत पोहोचला.
मैनपुरी जिल्ह्यातील या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
इंस्टाग्रामवरून प्रेमाची सुरुवात
फर्रुखाबादच्या रहिवासी राणी (वय 52) हिची सुमारे दीड वर्षांपूर्वी
इंस्टाग्रामवरून अरुण राजपूत (वय 26, रा. मैनपुरी) याच्याशी ओळख झाली.
हळूहळू ही ओळख प्रेमात बदलली.
राणीने आपलं खरं वय लपवण्यासाठी नेहमीच इंस्टाग्राम
फिल्टर्सचा वापर केला होता. त्यामुळे अरुण तिच्या प्रेमात आकंठ बुडाला.
पैशांचे व्यवहार आणि लग्नाचा दबाव
या नात्यात पैशांचे व्यवहार सुरू झाले.
राणीने अरुणला दीड लाख रुपये दिल्याचं समोर आलं आहे.
काही दिवसांपूर्वी राणीने अरुणवर पैसे परत करण्यासाठी आणि लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली.
“तू लग्न नाही केलं, किंवा पैसे दिले नाहीस तर मी पोलिसांकडे जाईन,”
असा इशाराही राणीने दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
झुडपांमधील भेट आणि खून
1० ऑगस्ट रोजी अरुणने राणीला मैनपुरीतील खारपरी बांबा परिसरात बोलावलं.
तिथं दोघांमध्ये वाद झाला. राणी पुन्हा लग्न आणि पैशांबाबत बोलू लागली.
पोलिसात जाण्याची धमकी तिने दिल्यानंतर अरुण संतापला.
त्याने राणीच्या ओढणीने तिचा गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह झुडपांत टाकून फरार झाला.
पोलिसांचा तपास आणि आरोपीला अटक
सुरुवातीला हा ‘ब्लाइंड मर्डर केस’ होता.
मात्र पोलिसांनी तीन पथकं तयार करून सखोल तपास सुरू केला.
कॉल डिटेल्सच्या आधारे अरुण राजपूतवर संशय घेतला गेला
चौकशीदरम्यान त्याने खुनाची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल फोनही जप्त केले आहेत.
एसपी सिटी अरुण कुमार सिंह यांनी माहिती देताना सांगितले,
“मृत महिला राणीने तिचं खरं वय लपवण्यासाठी इंस्टाग्रामवर फिल्टर्स वापरले.
पैशांच्या व्यवहारावरून वाद वाढत गेल्याने आरोपीने संतापाच्या भरात तिची हत्या केली.
त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.”
परिसरात खळबळ
या घटनेने संपूर्ण मैनपुरी परिसरात खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर झालेल्या प्रेमसंबंधाचा शेवट असा
दुर्दैवी ठरल्याने नागरिकांत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/manoj-vajpayeechaya-inspector-jhende-teamcha-siddhivinayakat-bappa-darshan/
