उद्योजकता जागरूकता कार्यक्रम संपन्न

“नोकरीत गुणाकार…पण उद्योगात काय होते?”

गाडगे महाराज महाविद्यालयात उद्योजकता जागरूकता कार्यक्रम उत्साहात संपन्न

हिरपूर : गाडगे महाराज महाविद्यालय, मुर्तिजापूर येथे अर्थशास्त्र विभाग, सूक्ष्म-मध्यम उद्योग मंत्रालय (भारत सरकार) आणि ईडो-जर्मन संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अ. एन. ठाकरे होते. प्रमुख मार्गदर्शन करताना प्रा. प्रवीण गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी “नोकरीत गुणाकार होतो; पण उद्योगात पटीने वाढ होते,” असे सांगत उद्योग क्षेत्रातील संधींची ओळख करून दिली. तसेच, स्वतःचा व्यवसाय उभारणे ही एक स्वतंत्र वाटचाल असून, त्यातून समाजातील अनेकांना रोजगारनिर्मिती करता येते, हेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. नरेश बनसोड यांनी “उद्योग म्हणजे स्वतंत्र प्रवास” असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राकडे आकर्षित होण्यासाठी प्रोत्साहित केले.व्यासपीठावर डॉ. यादव, डॉ. खनखने, प्रा. गावंडे, प्रा. राजपूत आणि प्रा. कंकाळे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच उद्योजकतेच्या संधींचा लाभ घेऊन समाजात नवे आदर्श निर्माण करावेत, असे प्रतिपादन केले.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग होता. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अर्चना गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. शामसुंदर यांनी मानले.

 या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योगक्षेत्राबाबत नवचेतना आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले.

read also : https://ajinkyabharat.com/srikshetra-kodoli-yehe-mass-dnyaneshwari-parianas-bhavikancha-excited-response/