अकोल्यातील उमरा गावात पारंपरिक बैलजोडी स्पर्धा म्हणजेच शंकर पट उत्साहात साजरा करण्यात आला.
यावर्षी या स्पर्धेत तब्बल १०१ बैलजोड्यांनी सहभाग घेतला
ज्यामुळे गावासह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेहोते स्पर्धेची सुरुवात सकाळी
Related News
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये पुन्हा वादळ, शिंदे आणि अजितदादा कार्यक्रमातून वगळले
“माचिस नाही दिली म्हणून क्रूर हत्याकांड! दिल्लीत दोन जणांचा पाठलाग करून खून”
BMC निवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का; संजना घाडी शिंदे गटात दाखल
वाढदिवसाच्या केकवर गुन्ह्यांची कलमे! भांडुपच्या गुंडाची ‘गुन्हेगारी थाटात’ पार्टी,
बोर्डी नदीपात्र कोरडेठाक; सहा गावांतील नागरिकांची पातुर तलावातून पाणी सोडण्याची मागणी
पेट्रोल पंपवर घटतौलीची तक्रार महागात पडली; ग्राहकाला लाठ्यांनी मारहाण, 3 सेल्समन अटकेत
उमरा येथे बांधकाम कामगारांसाठी ८ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर सुरू
थार गाडीच्या टपावर डान्स करणाऱ्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल
हैदराबादमधील पंचतारांकित हॉटेलला भीषण आग; SRH संघाची तातडीने सुरक्षित हलवणूक
27 मजली अँटिलियाच्या टॉप फ्लोअरवरच का राहतो अंबानी परिवार? वाचा या आलिशान राजवाड्याच्या काही अनोख्या गोष्टी
विचारांचे दीप पेटवणारा कार्यक्रम : शेकापूर फाट्यावर बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी
भटोरी येथे ट्रॅक्टरखाली दबून वयोवृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
पारंपरिक विधी आणि शंकराच्या पूजेनंतर करण्यात आली.
गावकरी आणि शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना रंगीबेरंगी सजावट करून स्पर्धेसाठी सज्ज केले होते
बैलांचे कौशल्य, वेग आणि शेतकऱ्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले
स्पर्धेत विविध गटांमध्ये बैलजोड्यांचे वर्गीकरण करण्यात आले होते
ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानात्मक टप्पे पार करताना बैलजोड्या आपली ताकद आणि समतोल दाखवत होत्या
विजेत्या बैलजोड्यांना विशेष पुरस्कार आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली
कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील प्रेक्षकांनी गर्दी केली होती
शेतकऱ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे
हा शंकर पट फक्त मनोरंजनासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्याचा एक उपक्रम आहे
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ आणि आयोजक मंडळाने अथक प्रयत्न केले
यामुळे उमरा गावात एकात्मता आणि सहकार्याचे उत्तम उदाहरण पहायला मिळाले
शंकर पटाची ही परंपरा गावकऱ्यांसाठी केवळ उत्सवच नाही, तर सामाजिक एकजुटीचे प्रतीक ठरली आहे
यामध्ये संभाजीनगर येथील चंद्रा-रूदा या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावित २१ हजारांच्या बक्षिसांचे मानकरी ठरले
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/akola-education-department-session-starts/