सम्राट वाईन शॉपवर मद्यपी ग्राहकांची लूट? आयकॉनिक बॉटलच्या दरावरून वाद; व्हिडिओ व्हायरल

सम्राट वाईन शॉपवर मद्यपी ग्राहकांची लूट? आयकॉनिक बॉटलच्या दरावरून वाद; व्हिडिओ व्हायरल

अकोला | प्रतिनिधी

अकोल्यातील सम्राट वाईन शॉप येथे मद्यपी ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये “आयकॉनिक” ब्रँडची दारू बॉटल १७० रुपये मूळ किंमतीऐवजी

तब्बल १९० ते २३० रुपयांना विकली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

एक ग्राहक ही बॉटल घेण्यासाठी गेला असता, दुकान व्यवस्थापकाने “ही बॉटल २३० रुपयांची आहे,

घ्यायची असेल तर घे, नाही तर नाही” असा थेट शब्दांत उत्तर दिलं. ग्राहकाने विरोध केल्यानंतर त्याला दोनशे रुपये परत देण्यात आले.

या घटनेचा व्हिडिओ ग्राहकाने सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या प्रकारामुळे दारू ग्राहकांकडून दररोज २० ते ३० रुपयांची लूट होत असल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे, बॉटलवरील एमआरपी आणि दुकानात सांगितला जाणारा दर यात मोठा फरक दिसून येतो.

त्यामुळे अकोल्यासह जिल्हाभरातील वाईन शॉप्समधूनही असा प्रकार घडत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित प्रशासन आणि पोलीस विभागाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी,

अशी मागणी आता अकोलेकर नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे.

ग्राहकांची आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी मूल्य नियंत्रण,

तपासणी आणि व्हिजिलन्स यंत्रणा सक्रिय करण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bharip-bahujan-mahasanghcha-maji-taluka-president-rajendra-khandare-yancha-dies/