‘Emergency’ चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे

अभिनेत्री

अभिनेत्री कंगना रणौत सध्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

विविध प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे ती प्रमोशन करत आहे. एकीकडे कंगनाचे

जोरदार प्रमोशन सुरू असतानाच, या चित्रपटाबद्दल वाद वाढत चालले आहेत.

Related News

सध्या सुरू असलेल्या वादांमुळे कंगनाचा हा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’

नियोजित 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार नाही. चित्रपटाची रीलिजची तारीख

पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी

यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय कंगनाने स्वतः ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे

दिग्दर्शन केले आहे. कंगनाचा हा आगामी चित्रपट 6 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये

दाखल होण्यासाठी सज्ज होता. परंतु प्रचंड वादाच्या पार्श्वभूमीवर, आता तो त्या तारखेला

रिलीज होणार नाही. शीख समुदायाने चित्रपटावर आक्षेप घेतला. हा चित्रपट

शीखविरोधी असल्याचा आरोप शीख समुदायाने केला आहे. लोकांनी कंगना रनौत

आणि निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्याची धमकी दिली आहे.

चित्रपटा ला विरोध करत मोहालीचे रहिवासी गुरिंदर सिंग आणि जगमोहन सिंग यांनी

हा चित्रपट आधी शिखांच्या प्रतिनिधींना दाखवावा, असा युक्तिवाद करत उच्च न्यायालयात

याचिका दाखल केली होती. यानंतर चित्रपटाच्या विरोधात सातत्याने आवाज उठवला

जात आहे. अकाली दल आणि एसजीपीसीनेही चित्रपटा ला विरोध केला होता.

मात्र आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याबद्दल अद्याप कुठलीही माहिती नाही.

Read also: https://ajinkyabharat.com/increase-in-co-morbidities/

Related News