गजानन हरणे यांची राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

गजानन हरणे यांची राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व सकारात्मक कार्य करण्याच्या

उद्देशाने स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या अकोला

जिल्हाध्यक्षपदी गजानन ओंकार हरणे यांची 5 जानेवारी 2025

Related News

रोजी राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण जेष्ठ समाजसेवक अध्यक्ष अण्णा हजारे,

कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार ,सचिव अशोक सब्बन,खजिनदार दत्ता

आवारी,सामाजिक कार्यकर्ते सुधाकर चौधरी प्रमोद धर्माळे
यांच्या उपस्थितीत अकोला जिल्हाअध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

.समाजसेवक गजानन हरणे हे गेल्या पस्तीस वर्षापासून ज्येष्ठ

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चळवळीशी

जुळलेले व्यक्तिमत्व असून यांची ओळख ही अकोला जिल्ह्यातील

एक तडफदार व्यक्तिमत्व व दबंग सामाजिक कार्यकर्ता म्हणून जन सामान्यात आहे.

हे जनसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे.

विविध सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून ते अविरत पणे समाजकार्य गेल्या

35 वर्षापासून करीत आहेत. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे प्रनेते

अण्णासाहेब हजारे यांनी जुनी संपूर्ण महाराष्ट्रातील भ्रष्टाचारविरोधी जना आंदोलन

न्यास काही काही तांत्रिक कारणामुळे बंद केल्यानंतर आता

नव्या दमाने संपूर्ण देश पातळीवर कार्य करणारी राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास स्थापन

करून पाच राज्यातील संघटन बांधणी झाल्यानंतर आता महाराष्ट्र मध्ये नवीन संघटन

बांधणी करण्याचे काम सुरू केले आहे त्याच अनुषंगाने अकोला जिल्ह्याची जबाबदारी

जुने जाणते पंचवीस वर्ष अकोला जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारीने जबाबदारी

सांभाळणारे तसेच न्यासाचे विश्वस्त राहिलेले समाजसेवक गजानन हरणे यांच्यावर

वीन सुरू केलेल्या राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी गजानन हरणे

यांची नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांना तसे नियुक्त पत्र सुद्धा देण्यात झालेल्या

मीटिंगमध्ये देण्यात आले.

असून अकोला जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारणी,तालुका कार्यकारणी,शहर

कार्यकारणी,गाव पातळीपर्यंत,संघटन बांधण्याचे अधिकार देण्यात आले आहे.

गजानन हरणे हे जनसामान्यांना होणारा त्रास निश्चितच पणे दूर करणार

आणि जनतेला न्याय देण्याचे काम हे करतीलच हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून वरिष्ठांनी पदाधिकाऱ्यांनी

दिलेल्या विश्वासाला जागून आपली जबाबदारी निर्भीडपणे सांभाळून

जिल्ह्याची संघटन बांधणीचे काम पुढील काळात करतील.

त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील सामाजिक राजकीय

क्षेत्रातील तसेच ग्रामीण पत्रकार क्षेत्रातील मंडळींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या नियुक्तीचे निर्भय बनो जण आंदोलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/road-blockade-movement-by-farmers-against-nafed/

Related News