एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुरघोडी? राजकीय वर्तुळात चर्चा

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुरघोडी? राजकीय वर्तुळात चर्चा

मुख्यमंत्री वैद्यकीय साह्य निधी कक्षाच्या कार्यानंतर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरजू रुग्णांसाठी

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली आहे.

या माध्यमातून राज्यातील गरीब रुग्णांना अधिक प्रभावीपणे मदत दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वय, विविध आरोग्य योजनांचा समावेश असून,

मोफत उपचारासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी राज्यभरात मुख्यमंत्री वैद्यकीय साह्य निधी कक्ष आधीपासूनच कार्यरत असताना,

आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नव्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या मदतीसाठी नवी समांतर यंत्रणा कार्यान्वित करून शिंदे यांनी

Related News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकप्रकारे कुरघोडी केल्याची चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४साली मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय साह्य निधी कक्षाची स्थापना करून गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली.

त्यानंतर मुख्यमंत्रिपदी असताना शिंदे यांनी या कक्षाचे काम प्रभावीपणे नेले.

त्याचवेळी उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी विधी आणि न्याय विभागाच्या अंतर्गत मंत्रालयात उपमुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केला.

या माध्यमातून धर्मादाय रूग्णालयांत निर्धन रूग्णांना उपचार, राज्यभरातून आरोग्य शिबिर भरवणे,

तेच महात्मा फुले जनाआरोग्य योजनेअंतर्गत रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासारखी सेवाभावी कामे केली जात होती.

मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांनी हा कक्ष मुख्यमंत्री साह्यता निधी कक्षाला जोडला आहे.

Related News