‘सैयारा’ चित्रपटातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री आता ऑफस्क्रीनही खरी ठरत आहे. अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी केवळ प्रेक्षकांची मनं जिंकलेली नाहीत, तर खऱ्या आयुष्यातही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत.
मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ 18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटातून अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अहान हा प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे.
पहिल्या चित्रपटातूनच अहान आणि अनितची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनावर घर करताना दिसली. ऑनस्क्रीन रोमँस हिट ठरल्यानंतर आता ऑफस्क्रीनही दोघं एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.
‘डीएनए’च्या वृत्तानुसार, अहान आणि अनितने आपलं नातं अजून सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीस हा पहिला मोठा चित्रपट असल्याने, भविष्यातील काम आणि चित्रपटप्रकल्प लक्षात घेऊन हे पाऊल त्यांनी उचलले आहे.
‘सैयारा’ पार्टीदरम्यान दोघांमधील जवळीक स्पष्ट दिसली.
एका मॉलमध्ये शॉपिंग करताना व्हिडीओ व्हायरल झाला; अहान अनितचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो, पण ती कॅमेरे पाहून नाकारते.
त्यानंतर दोघांचा एकाच कारने प्रवास करताना व्हिडीओ समोर आला.
सैयारा’च्या यशानंतर, अहान-अनितने आदित्य चोप्रासोबत तीन चित्रपटांची डील साइन केली आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.ऑनस्क्रीन रोमँस आता ऑफस्क्रीनही जीवंत; अहान आणि अनितची जोडी बॉक्स ऑफिसवर आणि चाहत्यांच्या मनात दोन्ही ठिकाणी हिट ठरली आहे.
