एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू

नळगंगा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

मलकापूर तालुक्यातील धरणगाव भालेगाव जवळ केशवा मंदिर परिसरातील नळगंगा नदीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माहिती अशी की, दसरखेड गावातील पाच मुलं घरातून कोणतीही माहिती न देता नदीत पोहण्यासाठी गेले होती.या घटनेत शुभम दवंगे (वय १६) आणि सोहम सोनवणे (वय १५) या दोन मुलांचा सहभाग होता. सध्या शुभम दवंगे याचा मृतदेह मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे, तर दुसऱ्या मुला सोहम सोनवणेचा शोध सुरू आहे.मलकापूर तहसीलदार राहुल तायडे आणि त्यांच्या टीमद्वारे शोधकार्य चालू आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली गेली असून, मृत्यू प्रकरण (MURDER) नोंदवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/arshdeep-singwar-porn-havabhawacha-charge/