एका हिंदू युवकाचा जीव वाचवण्यासाठी मुस्लीम युवक शहीद

संगमनेरात रियाज पिंजारीच्या शौर्याला सलाम 

संगमनेरमध्ये घडलेल्या हृदयद्रावक पण प्रेरणादायी घटनेत, रियाज पिंजारी नावाच्या मुस्लीम युवकाने आपला

जीव धोक्यात घालून एका हिंदू युवकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

सफाई कामगार अतुल पवार गटारात पडल्याची माहिती मिळताच रियाज क्षणाचाही विलंब न लावता तिथे उतरला.

दुर्दैवाने, दोघांचाही मृत्यू झाला. घटनेनंतर पाबळे वस्तीजवळील कोल्हेवाडी रोडवर स्थानिकांनी लावलेल्या बॅनरवर लिहिलं आहे —

“धर्माच्या नावाने भिंती उभ्या राहिल्या, पण त्याने त्या भिंती फोडल्या. एका अनोळखी जीवासाठी स्वतःचा प्राण दिला. तो फक्त मित्र नव्हता, तो माणुसकीचा खरा चेहरा होता.”

रियाज पिंजारीचं शौर्य आज धर्मापलीकडची मानवता आणि निर्भय माणुसकीचं जिवंत प्रतीक म्हणून ओळखलं जात आहे.

पंचक्रोशीत त्याच्या धाडसाची आणि निःस्वार्थी वृत्तीची प्रशंसा होत आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/prem-connections/