क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त Edufellow Hub (एजुफेलो हब) तर्फे “ऑनलाइन निबंध स्पर्धा 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय’ या विषयावर आधारित ही स्पर्धा
5 एप्रिलपर्यंत चालणार असून, यामध्ये दोन फेर्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या वैचारिक प्रगतीसाठी तसेच महापुरुषांचे विचार रुजवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा ऑनलाइन (MCQ) चाचणी व हस्तलिखित निबंध अशा दोन फेर्यांत पार पडणार आहे. प्रथम क्रमांकास 1000 रुपये, द्वितीय क्रमांकास 700 रुपये व तृतीय क्रमांकास 500 रुपये, तसेच प्रमाणपत्र व पुस्तके देण्यात येणार आहेत. सर्व सहभाग्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
या स्पर्धेसाठी डॉ. चेतन जाधव (गट विकास अधिकारी), कमलेश बहादुरे (कर व एलआयसी सल्लागार), प्रा. शैलेश हातबुडे, रुपाली कचरे, वैशाली मोरे, प्रा. घनश्याम दरने, , निखिल ढोक, अभी चोखांद्रे, प्रेम कास्तेकर, अविनाश चंद्रवंशी व शुभम गारशेटवाड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेसाठी निबंध 5 एप्रिलपर्यंत सादर करणे अनिवार्य असून, प्रवेश फी 20 रुपये आहे. नोंदणीसाठी पंकज (मो. 8263955620 व शुभम (मो. 7709486388 यांच्याशी संपर्क साधावा. एआय साधनांचा वापर केल्यास स्पर्धकास अपात्र ठरविण्यात येईल.
