दैनिक सुफ्फाचे मुख्य संपादक सज्जाद हुसैन आणि त्यांच्या कुटुंबीयांवर तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर
करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील विविध पत्रकार संघटनांच्या
प्रतिनिधींनी जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
ही घटना अकोला शहरातील इराणी झोपडपट्टीतील गुन्हेगारांविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत
पोलिसांनी केलेल्या कारवाईची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर घडली.
या बातमीमुळे संतप्त झालेल्या आरोपींनी हुसैन यांच्यावर हल्ला केला.
पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात आरोपींवर विविध गंभीर गुन्हेगारी
कलमांतर्गत आणि विशेषतः पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करण्यात आली.
ही घटना पुन्हा कुठल्याही पत्रकारासोबत घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलावी लागतील.
पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई होणे गरजेचे आहे.या प्रसंगी पत्रकारांनी पोलिस अधीक्षकांसमोर चिंता व्यक्त केली
पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी प्रतिनिधींना विश्वास दिला की, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल.
Read Also : https://ajinkyabharat.com/pm-kisan-sanman-nidhic-20/