बोरगाव मंजू | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील एका ३४ वर्षीय युवक शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे
शेवटी जीवनयात्रा संपवण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
विशाल सहदेव म्हैसने असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून,
ते बोरगाव मंजू येथील मेन रोडवरील रहिवासी होते.
कुटुंबाच्या उपजीविकेची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर असलेल्या विशाल
यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आणि वृद्ध वडील असा पाठीमागे दुःखद परिवार आहे.
ही घटना उघडकीस येताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
सततची नापिकी, कर्जाचा वाढता भार आणि उत्पन्नाचा अभाव यामुळे निर्माण झालेली
आर्थिक घडी कोसळल्याने विशाल यांना हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून,
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.