प्रत्येक तिकिटावर ३०% सवलत!

प्रत्येक

पुणे  : पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास आता आणखी स्वस्त आणि सोयीस्कर होणार आहे. पुणे मेट्रो प्रशासनाने शनिवारी आणि रविवारी प्रवाशांसाठी खास ‘विकेंड ऑफर’ जाहीर केली आहे. याअंतर्गत प्रत्येक प्रवासावर थेट ३० टक्के सवलत लागू करण्यात येणार आहे.या निर्णयामागील उद्देश म्हणजे प्रवाशांना मेट्रो प्रवासासाठी प्रोत्साहित करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे.

विकेंड प्रवाशांसाठी खास सुविधा

  • शनिवारी आणि रविवारी प्रत्येक प्रवासावर ३०% सवलत

  • सुरक्षित आणि आरामदायक आसनव्यवस्था

  • जलद प्रवासाचा अनुभव

पुणेकर बहुतेक वेळा विकेंडला खरेदीसाठी, पर्यटनासाठी किंवा मित्र-मित्रिणींची भेट घेण्यासाठी घराबाहेर पडतात. अशावेळी ही सवलत प्रवाशांसाठी मोठा दिलासादायक पर्याय ठरू शकतो.

पुणे मेट्रोची सेवा मार्गदर्शक माहिती

सध्या पुणे शहरात दोन मुख्य मार्गांवर मेट्रो सेवा सुरू आहे:

  1. पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर

  2. वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक

या वीकेंड ऑफरमुळे प्रवाशांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे, तसेच मेट्रोचा वापर करून नागरिकांना वाहनांच्या कोंडीपासून सुटका मिळण्याची संधी मिळेल.

प्रशासनाचे म्हणणे

मेट्रो प्रशासनाचे म्हणणे आहे की, “ही ऑफर पुणेकरांना जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा देण्यासाठी आहे. प्रवाशांनी वीकेंडला मेट्रोचा अधिकाधिक वापर करावा, हा आमचा मुख्य उद्देश आहे.”

read also : https://ajinkyabharat.com/tayyavar-kay-ghadal-jagavat-29-year-old-taruncha-dhakkadayak-deathu/