अकोला ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ आताच्या काळात हे शब्द फक्त कविते पुरतेच उरल्याचा अनुभव येतोय.वृक्षांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून वृक्ष आपले मिञ व कुटुंब आहेत ही भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येक नागरिक पर्यावरण प्रेमी वृक्षप्रेमींनी रक्षाबंधन निमित्त वृक्ष रक्षाबंधन करून वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन ऑक्सिजन मॅन स्वस्तिक पॅटर्नचे जनक ए.एस.नाथन यांनी केली आहे.
अकोल्यातील वृक्षमित्र नाथन यांनी रक्षाबांधनाच्या दिवशी अनोखं वृक्षरक्षाबंधनाची संकल्पना मांडली असून प्रत्येक घरातील वृक्षांना राखी बांधून, वृक्ष रक्षबांधनाची अनोखी संकल्पना साकार करीत वृक्षांचे संवर्धन व रक्षण करण्याचा संकल्प नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे.
देशभरात वृक्षचळवळ निर्माण व्हावी व सणाच्या माध्यमातून तरी लोक वृक्षांचं रक्षण करतील एवढाच उद्देश वृक्ष रक्षाबंधनाचा आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी वृक्षांना राखी बांधून त्यांना आपल्या कुटुंबातील एक सदस्य समजून वृक्षाप्रती आत्मीयता रहावी व प्रेम वाढावे या उद्देशाने हे रक्षाबंधन साजरे करण्यात यावे वृक्ष हे आपले भाऊ आहेत त्यामुळे यापुढे मी त्यांचे रक्षण करेल हीच प्रतिज्ञा या माध्यमातून घेतल्या जावी असे आवाहन वृक्षमित्र नाथन यांनी केले आहे.
संपूर्ण राज्यभरात सध्या एक विद्यार्थी एक वृक्ष अंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण सुरू आहे यापूर्वीही एक विद्यार्थी एक वृक्ष एक जन्म एक वृक्ष यासह विविध उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षांना सुद्धा राखी बांधून वृक्ष रक्षाबंधन प्रत्येकांनी साजरे करावे जेणेकरून वृक्षांची असलेले आपले नाते अधिक वृद्धिंगत होईल…
ए एस नाथन
ऑक्सिजन मॅन अकोला