पुण्यातील ससून रुग्णालयात मनोरुग्णाचा आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. 11 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणाने आपले आयुष्य संपवलं.मिळालेल्या माहितीनुसार, 20 दिवसांपूर्वी, 5 सप्टेंबर रोजी, विजय नावाच्या या मनोरुग्णाला रेल्वे पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले होते. यापूर्वी त्याने रेल्वे स्थानकासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान आज, 25 सप्टेंबर रोजी, त्याने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून प्राण गमावले.पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि अद्याप अधिक माहितीसाठी बातमी अपडेट होत आहे.
read also:https://ajinkyabharat.com/ki-khichaya-afwan-padli-away/
