हॉटेलमधील चहा पिणे आरोग्यास हानिकारक

चहाची

चहाची वेळ झाली की तो कधी समोर येतो, असं होतं.

चहा प्यायला अनेकांना आवडतं.

चहा आवडत नाही असं म्हणणारे क्वचितच लोकं भेटतात.

Related News

काहींना चहा पिल्याने डोकेदुखी दूर होते.

पावसाळ्यात तर चहाची मागणी आणखी वाढतेय.

पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर चहा पिण्याची

मजाच वेगळी असते. चहाच्या टपरीवर तुम्ही देखील चहा पित असाल

तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

कारण तुम्हाला माहीत आहे का की, चहामुळे देखील कॅन्सर होऊ शकतो ?

होय, आता तुमचा लाडका चहावालादेखील

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या तपासणीत आला आहे.

कोबीचे मंचुरियन, पाणीपुरी, कॉटन कैंडी आणि कबाब सारख्या

खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फूड कलरवर बंदी आणल्यानंतर

आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना चहाच्या पानांमध्ये प्रक्रियेदरम्यान

कीटकनाशके आणि रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आढळून आले आहे.

जे लोक खाद्यपदार्थ बनवतात आणि विकतात ते रोडामाइन-बी

आणि कार्मिसिन सारख्या खाद्य रंगांचा वापर करतात.

हे रंग अत्यंत विषारी मानले जातात.

चहाच्या पानांवर कीटकनाशके वापरले जातात.

ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.

कर्नाटकचे आरोग्य मंत्रालय लवकरच अशा चहाच्या बागांवर

कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे

जे चहा पिकवताना जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करतात.

कर्नाटक आरोग्य मंत्रालयाने विविध जिल्ह्यांमधून नमुने गोळा केले आहेत.

जिथे चहाचा वापर खूप जास्त आहे.

बागलकोट, बिदर, गदग, धारवाड, हुबळी, विजयनगर,

कोप्पल आणि बल्लारी या जिल्ह्यांत चहामध्ये कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात

वापर होत असल्याचे आढळून आले आहे.

जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.

Read also: https://ajinkyabharat.com/realme-gt-6-launched-with-amazing-features/

Related News