DRDO मध्ये 80 पदांची भरती; अर्जासाठी फी नाही, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी
नवी दिल्ली : रक्षा अनुसंधान आणि विकास संघटना (DRDO) अंतर्गत डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) येथे ITI उत्तीर्ण युवकांसाठी भरती निघाली आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.
या भरतीअंतर्गत एकूण ८० अप्रेंटिस पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये वेल्डर (२), टर्नर (५), मशीनिस्ट (१०), फिटर (१२), इलेक्ट्रॉनिक्स (६), इलेक्ट्रिशियन (१२), कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (३०), कारपेंटर (२) आणि
फोटोग्राफर (१) अशी पदे आहेत.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून ITI पदवी असणे आवश्यक आहे. फक्त रेग्युलर उमेदवारच पात्र असतील.
ज्यांनी आधीच Apprenticeship Act 1961 अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले आहे, ते अर्जासाठी पात्र राहणार नाहीत.
वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया
वयोमर्यादा अप्रेंटिसशिप नियमांनुसार निश्चित केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही, उमेदवारांची निवड गुणांच्या आधारे केली जाईल.
निवड झालेल्यांना नियमांनुसार मानधन दिले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
अर्ज करताना उमेदवारांना पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, कंडक्ट व कॅरेक्टर सर्टिफिकेट, फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट, दहावीचे प्रमाणपत्र, ITI सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), PWD सर्टिफिकेट (लागू
असल्यास), बँक पासबुकची प्रत, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत.
अर्ज प्रक्रिया
उमेदवारांनी apprenticeshipindia.gov.in वर जाऊन “Defence Metallurgical Research Laboratory” या Establishment सेक्शनवर क्लिक करावे.
Apply लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करावे, त्यानंतर लॉगिन करून अर्ज फॉर्म भरून सबमिट करावा. शेवटी अर्जाचा प्रिंट काढून ठेवावा.
महत्त्वाच्या तारखा
अर्जाची सुरुवात : ९ ऑगस्ट २०२५
अर्जाची शेवटची तारीख : ३० ऑगस्ट २०२५ Read also :https://ajinkyabharat.com/10-lakh-folk-number-honar-missing/