डॉ. वंदनाताई ज.ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालया कडून भव्य वासंतीक वमन शिबिर आयोजित

डॉ. वंदनाताई ज.ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालया कडून भव्य वासंतीक वमन शिबिर आयोजित

दि.२७ फेब्रुवारी २०२५

पातूर : धनेश्वरी मानव विकास मंडळ द्वारा संचालित आमदार डॉ राहुल पाटील शैक्षणिक

संकुलातील डॉ.वंदनाताई ज. ढोणे आयुर्वेद महाविदयालय रुग्णालय पातूर कडून सोमवार दिनांक

24 फेब्रुवारी ते 26 मार्च 2025 पर्यंत सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत भव्य वासंतीक वमन शिबिर ग्रामीण

Related News

आयुर्वेद महाविद्यालयाच्या रुग्णालय पातुर येथे आयोजित केले आहे.या शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभत आहे

वमन थेरपीमध्ये शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी एखाद्या व्यक्तीला उलट्या केल्या जातात.

आपल्या जीवनशैलीमुळे आणि आहारातील घटकांमुळे,अन्नाचा दर्जा आणि वातावरणातील बदलांमुळे शरीरात

अनेक विषारी द्रव्ये जमा होतात जी पुढे आजारांमध्ये रूपांतरित होतात. हा आयुर्वेद उपचारांचा सर्वात महत्वाचा भाग आहे.

या वमन प्रक्रियेमुळे ब्रोन्कियल दमा,श्वसन विकार,त्वचेचे विकार (सोरायसिस,एक्झिमा),मधूमेह, मायग्रेन,हायपर अ‍ॅसिडिटी,

लठ्ठपणा,स्त्रियांचे पाळीचे विकार,स्त्री-पुरुष वंध्यत्व, मानसिक विकार,एलर्जी मुळे होणारे सर्दी

या विकारांवर आयुर्वेदिक पद्धतीने निदान, वमन कर्म व तसेच इतर पंचकर्म व औषधी चिकित्सने खास उपचार केले जातील.

या शिबिरा करिता उपलब्ध तज्ञ डॉ.विजय कवळे ( प्रख्यात पंचकर्म तज्ञ) व सहकारी वैद्य

अश्विनी चौधरी,वैद्य सुधीर भुजबले,वैद्य चंद्रविजय भोयरे या तज्ञांचेही मार्गदर्शन लाभेल.

तसेच महाविद्यालयीन पंचकर्म विभाग व स्टाफ यांच्या सेवाभावाने संपन्न होणाऱ्या

आरोग्यदायी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे संचालक डॉ.साजिद सर,प्राचार्या

डॉ.जयश्री काटोले यांनी केले आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/first-creative-club-cha-madhamatun-vidyarthani-ghetle-robot-banavot/

Related News